Maharashtra board 10th and 12th exam result date likely to be announced soon


Maharashtra board 10th and 12th exam result date likely to be announced soon
*दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल बोर्डाची मोठी माहिती, उद्या सोमवारी (ता 5) निकाल *
सध्या सर्व विभागीय मंडळांच्या निकालांचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार असून उद्या सोमवारी (ता 5) बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी सांगितले. 


*दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल बोर्डाची मोठी माहिती

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही धाकधूक पाहायला मिळत आहे. आता नुकतंच दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे.

 *मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल येत्या ५ मे रोजी तर दहावीचा निकाल साधारणपणे ५ ते १० जून या कालावधीत जाहीर होणार आहे.* 

*यंदा परीक्षा लवकर...*
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षी पेक्षा १० दिवस अगोदर झाली होती. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या बारावीची परीक्षा झाली होती. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान पार पडली. या परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. 

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी काही वेबसाईट बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.

*निकाल कुठे पाहाल?*
*निकाल कसा चेक कराल?*
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा. होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा