शिक्षक व विद्यार्थी हितार्थ website चे विमोचननागपूर - शिक्षक व विद्यार्थ्यांना एकाच छताखाली संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग तर्फे संघटनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त website चे विमोचन आज (ता २७) करण्यात आले.

       आज नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ वैशाली जामदार यांच्या हस्ते शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली,शिक्षण उपनिरीक्षक  श्री श्रीराम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत https://www.vpssteacherassociation.com या website चा विमोचन व लोकार्पण सोहळा पार पडला.

या website च्या माध्यमातून शासन निर्णय, वैद्यकीय व अनुकंपाचे निर्णय, पेन्शन संदर्भातील माहिती, विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती योजनांची माहिती, फाॅर्म, राज्यातील शिक्षकांनी राबविलेल्या नवोपक्रमाची माहिती यासह शिक्षक, विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी माहिती प्राप्त होईल, अशी माहिती शिक्षक नेते व या अभिनव संकल्पनेचे निर्माते श्री मिलिंद वानखेडे यांनी दिली. तर हा उपक्रम चांगला असून या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थ्यांना एकाच छताखाली संपूर्ण माहिती उपलब्ध होईल, असा विश्वास शिक्षण उपसंचालक डॉ वैशाली जामदार यांनी व्यक्त केला. गेल्या सात वर्षांतील संघटनेच्या कामगिरीचे संघटनेच्या शैक्षणिक व सामाजिक चळवळीसाठी कौतुक करीत मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे,  केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, शिक्षण आयुक्त श्री विशाल सोळंकी, शिक्षण राज्यमंत्री श्री बच्चू कडू, काॅगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ, महाज्योतीचे संचालक श्री बबनराव तायवाडे, माजी गृहमंत्री श्री अनील देशमुख यांनी कौतुक करीत शुभेच्छा संदेश पाठविला आहे. या website विमोचन व लोकार्पण सोहळ्याला नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक श्री राजू हारगुडे, समाजकल्याण दिव्यांग आघाडी जिल्हा संघटक श्री दिनेश गेटमे, श्री शेषराव खार्डे, श्री गणेश खोब्रागडे यांच्यासह संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर हास्य फुलवा

शिक्षक व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी माहिती एकाच छताखाली आणण्याचा सुंदर प्रयत्न या माध्यमातून झाला आहे. शिक्षकांनी या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर हास्य फुलवावे व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे.

- डॉ वैशाली जामदार, शिक्षण उपसंचालक
नागपूर विभाग

1 टिप्पणी: