भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना । 11वी व 12 वी साठी वार्षिक 1 लाख रुपये.




1) ही योजना महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे,ज्याने 2020-2021च्या *10वीच्या परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण* मिळवले असतील. विद्यार्थी कोणत्याही विद्याशाखेत प्रवेश घेऊ शकतो *कला, विज्ञान,वाणिज्य अथवा इतर.* 11 वी प्रवेश घेऊन शाळेच्या प्राचार्यांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक.


2) ही योजना *दारिद्र रेषेखालील अथवा अडीच लाख रुपये* वार्षीक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.


3) या योजनेचा पहिला हप्ता 50 हजार रुपये असेल व नंतरचे 3 हप्त्यांसाठी 11वी व 12 वी च्या सहामाही व वार्षिक प


रीक्षेत 75% गुण असणे आवश्यक आहे.


4) या योजनेचा फॉर्म https://barti.in/notice-board.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  हा फॉर्म डाऊनलोड करून  सर्व महत्त्वाची माहिती भरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी २८, राणीचा,पुणे  बाग ४११००१ , या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.

२ टिप्पण्या:

  1. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म्हणजेच, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी भारत स्वतंत्र झाल्याबरोबर भारतीय जनतेला एक मौलिक संदेश दिला होता. तो असा की, लोकशाहीचे अस्तित्व आपणांस टिकवायचे असेल, तर आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. केवढी दुरदृृृृृष्‍टी होती या संदेशात !




    पण आपण आज - अगदी स्वतंत्र होऊनही साठ वर्षे झाली तरी या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या नाहीत. कोणत्याही क्षुल्लक कारणाने प्रक्षोभ झाला की, लगेच जाळपोळ, मोडतोड केली जाते. कारण आपण तेव्हा हे विसरलेले असतो की, अशा विध्वंसात आपण आपलेच नुकसान करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि साहित्य यांतून आपल्याला असे मोलाचे संदेश मिळत असतात.

    १४ एप्रिल १८९१ मध्ये एका गरीब घरात बाबासाहेबांचा जन्म झाला होता. त्यात भर म्हणजे 'मागासलेली जात' हा शिक्का उमटलेला. पण ते कोणत्याही अडचणीला डगमगले नाहीत. कशासाठीही कुरकुरत बसायचे नाही, हा तर त्यांचा निश्चय होता. त्यामुळे चाळीतल्या गोंगाटातही ते उत्तम अभ्यास करू शकले. माणूस फक्त ज्ञानामुळेच दु:खमुक्त होऊ शकतो, हे त्यांनी जाणले होते.

    डॉ. आंबेडकर यांनी स्वत:ची उन्नती तर साधलीच, पण त्यांचा मोठेपणा असा की, ते आपल्या अन्यायग्रस्त समाजालाही विसरले नाहीत. आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले होते.

    उत्तर द्याहटवा