महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे ४११००४
सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात (CET) ऑनलाईन आवदेनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
२०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि .२१ ऑगस्ट , २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात आले आहे . या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ .१० वी ) परीक्षेमध्ये उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि .२० / ०७ / २०२१ रोजी सकाळी ११.३० पासून दि .२६ / ०७ / २०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात आली होती . तांत्रिक कारणास्तव सदर संकेतस्थळ तूर्त बंद ठेवण्यात आले आहे . सदर सुविधा पूर्ववत सुरु झालेनंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल . तसेच सदर परीक्षेचे आवेदनपत्रे भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी .
CET exam
उत्तर द्याहटवाVishakha Ashok Raut
उत्तर द्याहटवाsampadamankar
हटवाsampadamankar077@gmail.com
उत्तर द्याहटवा