इयत्ता बारावी मूल्यमापन बाबत शंका समाधान | HSC



 12 वी चा  मूल्यमापन बाबत 





1) प्रश्न:- पर्यावरण विषयाचे गुण सरासरी मध्ये विचारात घ्यावेत का ?

उत्तर:- पर्यावरण या विषयाच्या मूल्यमापनात लेखी परीक्षा असा कोणताही भाग नाही, त्यामुळे पर्यावरणाचे गुण सरासरी मध्ये घेता येणार नाहीत.

2) प्रश्न:- पुनर परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पर्यावरण विषयाचे त्यावेळी गुण होते पण आता श्रेणी आहे मग नोंद कशी करावी ?

 उत्तर:- पुनर परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते पर्यावरण विषय उत्तीर्ण असल्याने त्यांच्यासाठी ही E (exemped)  असा पर्याय देण्यात आला आहे त्यानुसार नोंद करावी.

3) प्रश्न :- पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे Private या यादीत दिसत आहेत याबाबत काय करावे?

 उत्तर :-जे विद्यार्थी सर्व विषयासह पुनर परीक्षार्थी आहेत त्यांचे मूल्यमापन खाजगी विद्यार्थ्यांप्रमाणेच आहे म्हणून त्यांचा समावेश  Private टॅब मध्ये करण्यात आलेला आहे.

4) प्रश्न :-काही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी सर्व विषय घेऊन परीक्षा देत आहेत पण त्यांची नावे रेग्युलर मध्ये आलेले आहेत यावर उपाय काय ?

 उत्तर :- काही महाविद्यालयांनी एका शाखेत बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विषय बदलून ुसर्‍या शाखेत सर्व विषय घेऊन फॉर्म भरलेले आहेत हे कामकाज चुकीच्या पद्धतीने झालेले असल्याने त्यांच्या बाबतीत कोणताही मार्ग काढता येणार नाही . आहे त्याच पद्धतीने मूल्यमापन करावे लागेल.


💥💥💥💥💥💥💥💥💥


विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)


💥💥💥💥💥💥💥💥💥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा