*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे संविधान  दिन उत्साहात साजरा*


रामटेक - संविधानच्या माध्यमातुन देशात लोकशाही नांदत आहे. या संविधानचा माध्यमातुन भारत हा जगातील लोकतंञ देश म्हणून ओळखला जातो यासाठी सर्वानी संविधानाचे काटेकोर वाचन करावे असे आवाहन माॅयल कर्मिक अधिकारी ललित अरसडे यांनी केले  'माझे संविधान माझा अभिमान' या उपक्रमांतर्गत प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कांद्री माईन येथे 'संविधान दिवस' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून कांद्री- माईन येथील कार्मीक अधिकारी श्री. ललित अडसरे,माॅयल अधिकारी  श्री. प्रवीण गजभिये उपस्थित होते.


       कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान वर्ग ८ वी चा विद्यार्थी सम्यक खोब्रागडे  याने संविधानाची कलमांविषयी माहिती सांगितली. तसेच वर्ग 10 वी ची विद्यार्थिनी गायत्री अजय कटोते हिने सुद्धा संविधानाची कलमे  सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. ललित अडसरे यांनी संविधान व संविधानाची गरज या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. प्रवीण गजभिये यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मिलिंद वानखेडे  यांनी विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय? व त्याची आपणास गरज काय? या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी संविधानाची निर्मिती, अधिकार, कर्तव्य, संविधानाची अमलबजावणी यासंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन प्रत्येक घरी संविधान असणे आवश्यक असल्याचे सांगून त्याचे वाचन करण्याचे आवाहन केले लाईव अर्थ सेवा संरक्षण ट्रस्ट कडून शाळेला संविधान उद्देशिका भेट देण्यात आली विद्यार्थ्यांन करिता प्रश्नमंजूषा कार्यक्रम घेण्यात आला यात अष्टाग घरडे व निखिल कठौते प्रथम आले तसेच वाॅक फार संविधान केले.


      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कामिनी पाटील यांनी तर आभार  श्री. अशोक नाटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विजयकुमार लांडे, श्री. प्रशांत सरपाते, सौ. सुचिता बिरोले, ज्योत्स्ना मेश्राम, सौ. अनिता खंडाईत, वसंतराव ठाकरेंले, प्रभाकरजी खंडाते व शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा