SSC Results उद्या दहावीचा निकाल दुपारी 1.00 वा जाहिर होणार*


*उद्या दहावीचा निकाल दुपारी 1.00 वा जाहिर होणार*


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून ) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली.

दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा