25 सप्टेंबर दिनविशेष


*25 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*

🛟 *शनिवार* 🛟


*जागतिक हृदय दिन*
*जागतिक फार्मासिस्ट दिन*

       🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2022 - क्युबा देशात समलिंगी विवाह व समलिंगी दत्तक घेणे कायदेशीर करण्यावर मतदान झाले*
👉 *1992 - मार्स ऑब्झर्व्हर मिशन - नासानेलाॅचकेले 11 महिन्या नंतर ऑर्बिटल ईन्सरची तयारी करताना हा प्रोब अयशस्वी झाला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1939 - फिरोज खान- भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते याचा जन्म*
👉 *1940 - टिम सेव्हरिन- भारतीय इंग्रजी संशोधक, इतिहासकार आणि लेखक याचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2004 - अरूण कोलटकर - भारतीय इंग्रजी व मराठी कवी यांचे निधन*
👉  *2022 - एस.पी. बालसुब्रम्हण्यम- चित्रपट पार्श्वगायक व पद्मभूषण, पद्मश्री यांचे निधन*
  
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
   *आळस हा महारोग*

      या देशात माणूस बळकट आणि स्वावलंबी असला पाहिजे.पण आज आपली स्थिती तशी नाही. आपण आळशी आणि दुबळे आहोत. तसे नसते तर ५० कोटी लोकसंख्याच्या भारताने १८कोटीच्या अमेरिकेला भीक  मागितली नसती.त्यांनी आपल्याला अन्न,शस्त्र आणि अक्कल पुरवावी ही शरमेची गोष्ट आहे.आळस आणि दारिद्र या गोष्टी या देशात महा रोगासारख्या पसरल्या आहेत. येथे जातीभेद, धर्मभेद ,पक्षभेद खूप बोकाळले आहेत.आता आपणास सर्व विसरले पाहिजे.आपण कोणत्याही जातीचे अगर पक्षाचे असा, पण तुमचे कर्तव्य आहे ते करणे हा तुमचा धर्म आहे.तुम्ही जर शेतकरी असाल तर  इमानदारीने शेती करणे हा तुमचा धर्म आहे. जर तुम्ही सरकारी नोकर असाल तर लाचलुचपत न घेता प्रामाणिकपणे  लोकांची सेवा करणे हा तुमचा धर्म आहे. मजूर ,कामगार, नोकर, अधिकारी या सर्वांनी आपापले कर्तव्य ओळखली पाहिजे.गीतेची  सुद्धा धर्माची व्याख्या कर्तव्य हीच आहे.

     *भक्तीचे नवे रूप*-

भक्तीची आणि पूजेची भावना सुद्धा आता आपल्याला बदलून घेतली पाहिजे .देवाची प्राप्ती गंध लावून आणि मूर्तीपुढे घंटी वाजवून होते अशी कोणाची समजूत असेल तर ती चुकीचे आहे. कर्मकांडाने कोणालाही देव प्रसन्न झाला नाही. उलट सावता माळी माळ्याला देव प्रसन्न झाला तो त्याला शेतात भाजी पिकवताना पाहून,
गोरा कुंभाराला देव प्राप्त झाला तो मडकी घडवितांना, रोहिदास चांभाराने देवाची पूजा जोडे शिवून केली. पुंडलिकाने आई-बापाची सेवा करून केली. देवाच्या प्राप्तीसाठी भजन पूजन करण्याची आवश्यकता नाही. प्रामाणिक माणसांला आपले काम करीत असतानाच देवाचे दर्शन घडते. उलट बेईमान माणसाने कितीही टाळ कुटले आणि देवा पुढे मस्त घातले तरी त्याला देव दिसू शकत नाही .

 
संदर्भ-राष्ट्रसंताची भाषणे

_*सुविचार *_
     ┅━═#########═━┅

*दुसऱ्याचं निरीक्षण करत राहिल्यास, निंदा करण्याची वृत्ती नकळतच वाढत जाते, पण आत्मनिरीक्षण केलं की, आपल्यातील अवगुण सहज लक्षात येतात.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _*म्हणी व अर्थ *_

*ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.*

*अर्थ:- एखादी गोष्ट चांगली असली म्हणून ती फार उपभोगू नये.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          _*🥇सामान्य ज्ञान 🥇*_
     ┅━═########═━┅

*👉जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?*
*🥇सहारा*

*👉इजिप्तमधील प्रसिध्द नदी कोणती ?*
*🥇नाईल*

*👉जागतिक महिला दिवस केव्हा साजरा करतात ?*
*🥇८ मार्च*

*👉भारतात सर्वांत जास्त लोकसंख्या असणारे शहर कोणते ?*
*🥇मुंबई*

*👉भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिने मोठे राज्य कोणते आहे ?*  
*🥇राजस्थान*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _*बोधकथा *_
    
*कर्म आणि धर्म*

*भगवान गौतम बुद्ध यांना एका गावी प्रवचनासाठी निमंत्रण दिले होते. ज्या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते तो अत्यंत भाविक होता. आपणाबरोबर आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा हि त्याची इच्छा होती. गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता. त्याला पार होता. तेथे प्रवचन घेण्याचे ठरले. ज्या दिवशी प्रवचन सुरु होणार त्यादिवशीच त्या शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले, त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला असता दावं तोडून बैल निघून गेला. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस-दोन कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते. तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आले नाही. तोपर्यंत प्रवचन संपले होते. गावकरी घरी निघून गेले होते. बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याच दुख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होते.*

           *दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे गौतम बुद्धांच्या पाया पडून तो म्हणाला," महाराज, मी काल प्रवचनाला येवू शकलो नाही. क्षमा करा. माझा बैल हरवला होता. पण बैलाला शोधतानासुद्धा माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याचे दुख मनाला डाचत होते." यावर बुद्ध मंदस्मित करीत म्हणाले," चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख तुला झाले यातच तुझे भले आहे. आणि बैलाला शोधणे हे तुझे कर्तव्य आहे. तू बैलाला शोधात असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता म्हणजेच तू कर्म करत असताना धर्माचा विचार करत होता, कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे."*

*🧠तात्पर्य- कर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे* 
*मुख्याध्यापक* 
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन* 
*9860214288*
‐-------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा