सरकारी-निमसरकारी नौकरी चा खाजगीकरण विरोधात......


बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवापुरवठादार एजन्सी द्वारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती करणे बाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करणेबाबत *विदर्भ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघातर्फे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे जी यांना पत्र.*


हा निर्णय कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करून त्यांना अंधारात लोटणारा आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या स्वप्नांची राख करणारा हा निर्णय आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनिर्बंध शोषण करणारा, समानतेच्या व सामाजिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फसणारा हा निर्णय असल्याचे *शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे सरांनी सांगितले आहे.*

*#6सप्टेंबरचा_काळा_जीआर_रद्द_करा*
*विदर्भ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग*

नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करताना
*श्री मिलिंद वानखेडे* - शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष
विदर्भ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग
*श्री खिमेश बढिये* - विभागीय सचिव
*श्री प्रकाश भोयर* - नागपूर विभागीय अध्यक्ष, काॅग्रेस मुख्याध्यापक संघ
*श्री शेषराव खार्डे* - जिल्हा माध्यमिक संघटक
*श्री संजय धरममाळी* - जिल्हा अध्यक्ष, काॅग्रेस शिक्षक सेल
*श्री नामा जाधव*- अध्यक्ष, विदर्भ शिक्षक संघ
*श्री दिपक नागपुरे* - शिक्षक भारती
यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा