रक्तदान ही चळवळ म्हणून स्विकारा....मिलिंद वानखेडे


*#रक्तदान_ही_चळवळ_म्हणून_स्विकारा__मुख्याध्यापक #वानखेडे*


*12 वी चा विद्यार्थ्यांनी ईको ब्रिक्स चे प्रात्यक्षिक करून दिले*


रामटेक - रक्तदानामुळे गरजवंताना वेळेवर रक्त उपलब्ध होते. त्यामुळे रक्तदान ही चळवळ म्हणून उभी करावी, असे आवाहन मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी केले.
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर) येथे आयोजित आज (ता ११) रक्तदान शिबिरात बोलत होते.

ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्व बळीरामजी दखने यांच्या 20 व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिन, जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष स्व श्री बळीरामजी दखने यांच्या १०3 व्या जयंतीनिमित्त तसेच माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार जयंतीनिमित्त आज (ता ११)
भव्य रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कान्द्री-माईन चे नवनिर्वाचित संरपच ममता बन्सोड, उपसरपंच राजा कठौते ,सदस्य राजु डोंगरे ,अंबिका कठौते, दिपक रौतेल , श्रृती कुमरे ,कपिल देशमुख, गौतमी राऊत, प्रतिमा भोयर, पुजा मडावी, रंजना भलावी, रंजना हारोडे, दिपक घरडे, गोलु यादव, बोर्डा चे उपसरपंच पंकज चौधरी, हर्षपाल मेश्राम, मनसर चे सदस्य नितेश डेहरिया, प्रकाश हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक उमेशकुमार चौकसे उपस्थित होते, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभागाचे विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, टोल मॅनेजर श्री अतुल आदमने, माजी विद्यार्थी सचिन डोले, मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे होते. यावेळी सर्व ग्राम पंचायत सदस्या चा सत्कार करण्यात आला सचिन डोले यांनी शाळेला पुस्तका भेट दिली 12 वी चा विद्यार्थ्यांनी ईको ब्रिक्स चे प्रात्यक्षिक करून दाखविले आरोग्य तपासणीत 78 नागरिकांनी केली व सर्व विद्यार्थ्यांनी रक्त तपासणी केली ,नितेश बागडे, निलेश टोगंसे, मुकेश सोमकुवर महेश रंदीये, नरेश चुरबिया, पंकज हांडे, दुर्गेश राऊत, दिलीप जांभळे , उद्देश कठौते, विशाल रौतेल सह 21 रक्तदातानी रक्त दिले त्याच बरोबर गरजवंत नागरिकांना बॅलकेट वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सुञसंचालन सौ कामिनी पाटील यांनी केले तर आभार अशोक नाटकर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री श्याम गासमवार, श्री प्रशांत सरपाते, सौ.सुचिता बिरोले ,सौ.महानंदा इळपाते, सौ.अनिता खंडाईत, कु.ज्योत्सना मेश्राम, बसंत ठकराले, प्रभाकर खंडाते, मिलिंद वाघमारे प्रयत्नशील होते

या कार्यक्रमाला विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, मनसर, रामटेक, पारशिवनी व कन्हान येथील पत्रकार संघ, बिरसा मुंडा फुटबॉल क्लब कांद्री, लाईव्ह अर्थ संरक्षण सेवा ट्रस्ट नागपूर, अभिनव शेतकरी संघटना भिलेवाडा यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा