*बेलडोंगरी माईन येथे प्रकाश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादरीकरण* .


*बेलडोंगरी माईन येथे प्रकाश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादरीकरण*


*आगामी काळात राजधानी दिल्ली येथे सादरीकरणाची संधी*


मनसर - माॅयल लिमिटेड बेलडोंगरी माईन (साटक) येथे आज (ता ५ ) *"व्यसनमुक्ती व हिन्दी भाषा बढावा"* याविषयावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. यावेळी कर्मिक अधिकारी ललीत अरसडे यांच्यासह माॅयल कर्मचारी उपस्थित होते. या सादरीकरणात *प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन च्या* विद्यार्थ्यांनी व्यसनामुळे शरिराची होणारी हानी, सामाजिक ऐक्याला धक्का, कौटुंबिक हिंसाचार, कामाची अनियमितता, राष्ट्रीय एकात्मता, हिन्दी भाषा महत्त्व, विविध भाषांचे प्रत्यक्षात सादरीकरण केले. अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आल्यामुळे खान प्रबंधकांकडून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करुन सत्कार करण्यात आला. *या प्रभावी सादरीकरणामुळे प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन शाळेचे पथनाट्य राजधानी दिल्लीत लवकरच डेरेदाखल होऊन आपल्या कलेची चुणूक दाखवणार आहे* पथनाट्य सादरीकरणात हर्षीता कठौते, साक्षी खोब्रागडे, साक्षी कठौते, तानिया रौतेल, स्नेहा रौतेल, दिपक ठाकरे, रोशन कुभरे, हर्ष कठौते, सोमकुमार कठौते, अंचीत उईके, मयंक कठौते या विद्यार्थ्यांचा समावेश होता. मार्गदर्शन प्रा. ज्योत्सना मेश्राम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा