दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


  

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्य मंडळाने शुक्रवारी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता नियमित लेखी परीक्षा होणार आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. तत्पूर्वी, दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा