जेईई एमएच सीईटी व निट स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण! mahajyoti.org.in


महाराष्ट्र शासनाच्या "महाज्योतीच्या"  वतीने ओबीसी, भटक्याजाती जमाती व   विशेष मागास वर्ग विद्यार्थ्यांना २०२३ च्या जेईई एमएच सीईटी व निट स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण!

 महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपुर

आपण दहावी पास झालात!अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. २०२३ च्या १२वी परीक्षेनंतर  नंतर इंजिनिअर मेडीकल साठीची  सीईटी  परीक्षा द्यायची आहे.महागडे कोचिंग क्लास लावणे जड जाते!

काळजी करू नका!

महाज्योती आपणाला   स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन  मोफत प्रशिक्षण देईल!  या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी साठी मोफत स्पर्धा परीक्षेची पुस्तके, मोफत टॅबलेट व सोबत दररोजचा ६ जीबी  इंटरनेट डेटा देईल!

  त्यासाठी अर्ज करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे!

शहरी विभागात शिकणार्‍या विद्यार्थ्याला यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ७०% तर ग्रामीण , आदिवासी नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ६०% मार्क्स असणे आवश्यक.सोबत ओबीसी, भटक्याजाती व विशेष मागास प्रवर्ग आणि नाॅन क्रिमिलेयरचे प्रमाणपत्र आवश्यक!

आजच

महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in 

या वेबसाईट वर जावुन, नोटीस बोर्डवर क्लीक करून, आपला प्रवेश अर्ज अपलोड करा! व महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या!




२ टिप्पण्या: