युनियन बँक ऑफ इंडिया कांद्री तर्फे विद्यार्थ्यांना बुक वितरण व वॄक्षारोपन कार्यक्रम | Union Bank of India


आज दिनांक 29 /10/ 2021  रोजी युनियन बँक ऑफ इंडिया कांद्री कन्हान तर्फे प्रकाश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कांद्री माईन येथे सतर्कता जागृत सप्ताह या अभियानांतर्गत वर्ग 5 ते 12 या वर्गातील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश हायस्कूल कान्द्री माईन येथील मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे  उपस्थित होते तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युनियन बँक ऑफ इंडिया कान्द्री कन्हान  चे व्यवस्थापक श्री रवींद्र पाटील सर हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रफूल घराने सर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना सतत जागरूक सप्ताह याबद्दल माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या जीवनात अभ्यासाचे महत्त्व या विषयावर सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक श्री प्रशांत सरपाते यांनी केले या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक ज्योत्सना मेश्राम.  श्री. मिलिंद वाघमारे तसेच शाळेतील शाळेतील गरजवंत  विद्यार्थी उपस्थित होते. 


संबंधित शोध

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा