2016 पासूनच्या GPF पावत्या शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांना तातडीने उपलब्ध करून द्या


 2016 पासूनच्या GPF पावत्या शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांना तातडीने उपलब्ध करून द्या


विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) नागपूर विभाग नागपूर यांची मागणीनागपूर -  नागपूर जिल्ह्य़ातील खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांना अद्यापही सन २०१६ पासून GPF पावत्या मिळाल्या नसल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो. सबब शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने GPF च्या पावत्या अदा कराव्या अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वेतन पथक (माध्यमिक) अधिक्षक श्री सोनटक्के यांच्याकडे केली.

माध्यमिक वेतन पथक कार्यालयांतर्गत नागपूर जिल्ह्य़ात १०६५ शाळा व महाविद्यालये कार्यरत आहे. यात कार्यरत १३५२७ कर्मचाऱ्यांपैकी १००६० GPF धारक तर ३४६७ NPS धारक कर्मचारी कार्यरत आहे. DCPS धारक कर्मचाऱ्यांचे खाते NPS मध्ये convert करण्याचे काम तातडीने सुरू असून त्यामुळे GPF धारकांना मार्च २०२२ पर्यंत पावत्या देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन अधिक्षक श्री सोनटक्के यांनी दिले. सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना अद्यापही मिळाले नाही. या हप्त्यासाठी ६० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे केवळ नागपूर जिल्ह्य़ातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळाला नसल्याचे मान्य केले. मात्र आता शासनाकडे पहिल्या हप्त्यासाठी ६० कोटी व दुसऱ्या हप्त्यासाठी ६० तसेच थकीत वेतन व इतर तत्सम घटकासाठी १९ कोटी असे एकूण १३९ कोटी रुपयांची मागणी केली असून ते प्राप्त होताच पूर्ण थकीत विषय तातडीने मार्गी लागेल असे आश्वासन वेतन पथक कार्यालयातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिष्टमंडळात शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री धिरज यादव, मुख्याध्यापक संघाचे कामठी तालुका अध्यक्ष श्री कुळकर्णी, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्री सतीश डहाट, श्री उमेश शेंडे, श्री आकाश कट्यारपवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा