BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक हक्काच्या पैशापासून वंचित


 BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक हक्काच्या पैशापासून वंचित
२० नोव्हेंबर २०२१ -

राज्यभर BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित आहेत. त्यासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) च्या वतीने संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी शुक्रवारी (ता १९) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. लवकरच हिवाळी अधिवेशनात श्री मिलिंद वानखेडे स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊनही मंत्री महोदयांना याबाबतची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत.  


शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वैयक्तीक कामं, मुलांच्या लग्नांसाठी, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, गृह कर्ज हफ्ता भरण्यासाठी स्वतःच्या PF खात्यातून पैसे मिळण्याबाबत अर्ज केलेले आहेत. मात्र राज्यभर BDS प्रणाली बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीयेत. वेळेवर पैसे न मिळाल्याने शिक्षक, कर्मचारी यांच्या समोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांचे उपचार थकले आहेत. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या मुलांची फी थकली आहेत, अशी माहिती विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभागाचे सचिव खिमेश बढिये यांनी दिली आहे. 


शिक्षक, कर्मचारी यांना त्यांच्या हक्काचे पैसे देणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे न झाल्यास शासनाबद्दल एक अविश्वासाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे तात्काळ BDS प्रणाली सुरू करून PF धारकांना महिना अखेरपर्यंत त्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्यास विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा