धर्मराज शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण |


 धर्मराज शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत संपूर्ण देशभरात शुक्रवारी (ता १२) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

    हे सर्वेक्षण विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती मधील संपादणूकीचे मूल्यांकन करणे व देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणेसाठी एकाच दिवशी संपूर्ण देशात हे सर्वेक्षण होत आहे. प्रस्तुत सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील इयत्ता ३ री, ५वी, ८वी व १० वी चे एकूण ७३३० शाळा व  २,३४,०५५ विद्यार्थी यांची निवड केंद्र शासनामार्फत करण्यात आली आहे. या सर्वेक्षण अंतर्गत धर्मराज प्राथमिक शाळेत व विद्यालयात इयत्ता तिसरी, आठवी व दहावी च्या प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांची निवड करुन परीक्षा घेण्यात आली. 

यावेळी तिसरीसाठी क्षेत्रीय निरीक्षक सौ माधुरी खोडे, क्षेत्रीय अन्वेषक सौ वैशाली सावरकर, सौ सुनंदा भगत यांनी तर आठवी दहावीसाठी जयश्री कानतोडे, ज्योती अंबादे, निलेश मुळे यांनी 

परीक्षक म्हणून कार्य केले. पारशिवनी तालुक्यात सदर सर्वेक्षण कार्य गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. मुख्याध्यापक पमिता वासनिक, मुख्याध्यापक आशा हटवार, उपमुख्याध्यापक रमेश साखरकर, चित्रलेखा धानफोले, खिमेशकुमार बढिये, भिमराव शिंदेमेश्राम, हरिष केवटे, उदय भस्मे, राजू भस्मे, अमित मेंघरे, लिखिता धांडे,  किशोर जिभकाटे, अनिल सार्वे, अपर्णा बावणकुळे, शारदा समरीत, प्रीती सेंगर, हर्षकला चौधरी व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा