How to join NDA (National Defence Academy)? तयारी एन.डी.ए ची…!!!



(ही माहिती जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल.



         देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.


         भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" म्हणजेच "National Defence Academy (NDA) / एन.डी.ए." च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए., खडकवासला, पूणे  येथे करवून घेतली जाते. 


पात्रता:

शैक्षणिक पात्रता:

         एन.डी.ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत असावा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे. 


वयोमर्यादा:

         एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय - साडे सोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.


निवड प्रक्रिया:

         एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.


प्रवेश परीक्षा:

         एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते. 


सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:

         भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणार्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते.


पहिला टप्पा:

         या टप्यास स्क्रिनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसर्या टप्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात.


दुसरा टप्पा:

         या टप्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स (Group  Tasks) व वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. दिलेल्या विविध परिस्थितींमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वत:बद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्स मध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध अडथळे एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघ नायक म्हणून कश्याप्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याच बरोबर येथे गट चर्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजी मध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर तीन मिनिटे भाषण करणे, तसेच जमिनीवरचे विविध अडथळे तीन मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो. हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणार्या उमेदवारांची Pilot Aptitude Battery Test  (PABT) ही आणखी एक चाचणी होते.

         मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एन.डी.ए च्या आर्मी, नौदल किंवा हवाई दल या शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो.


एन.डी.ए. मधील प्रशिक्षण:

         एन.डी.ए. मधील प्रशिक्षण कालावधी हा बी. एस. सी. तीन तर बी. ई. चार वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए. मधील बी. एस. सी. चा तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो तर बी. ई. 8 टर्म मध्ये. 

येथील प्रशिक्षणात ७०% भर अभ्यासावर तर ३०% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मधे विभागणी केली जाते. हे स्क्वाड्रन्स हेच पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड, पोहणे, विविध खेळांची तयारी करवून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका १२वी पास विद्यार्थ्यामधून भविष्यातील लष्करी अधिकार्यामधे रुपांतर केले जाते. एन.डी.ए. चे तीन / चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. एन.डी.ए. च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असतांना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडविलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिलेल्या हजारो दर्जेदार अधिकार्यांपैकी अनेक अधिकार्यांना त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्या बद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वाड्रन्स लीडर राकेश शर्मा (अशोक चक्र) हे देखील एन.डी.ए. च्या ३५व्या तुकडीचे विद्यार्थी होते. १२वी नंतर करिअर करण्यासाठी एन.डी.ए. हा सर्वोत्तम पर्याय आहे.  


सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:

         एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. पैरा जंपींग, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायंबींग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते. 

सातव्या वेतन आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी. कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, अभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या मैनेजमेंट कॉलेज मध…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा