विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेला महत्त्व द्यावे - सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते
मनसर- विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेला महत्त्व देत सुखकर प्रवास करावा. अपघात मुक्त प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सहाय्यक  पोलीस निरीक्षक निशा भुते यांनी केले.

येथील प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक  पोलीस निरीक्षक निशा भुते,वाहतूक पोलीस   सतीश इप्पर  व अनुपम पाटील हे  उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी वाहतूक नियम, कायदे, नियंत्रण तसेच कोविड नियम इत्यादी विषयांवर मनसोक्त चर्चा करुन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून वाहतूक नियमांची माहिती दिली. प्रत्येक नागरिकाने अपघात मुक्त राज्य घडविण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी केले.

कार्यक्रमा चे सुञसंचालन सहायक शिक्षक श्री. प्रशांत सरपाते यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. अनिता खंडाईत यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी ज्योत्सना मेश्राम,  विजय लांडे, श्याम गासमवर,महानंदा इळपाते,  कामिनी पाटील , मिलिंद वाघमारे, प्रभाकर खंडाते सह विद्यार्थी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा