रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांकडून रक्तदान


 कांद्री माईन येथील रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराला भरघोस प्रतिसाद

रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांकडून रक्तदान

१०१ गरजवंतांना ब्लॅकेटचे वाटप




रामटेक - तालुक्यातील कांद्री माईन (मनसर) येथील प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर) येथे कोविड - १९ च्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या मदतीसाठी आज (ता ११) आयोजित रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर १०१ गरजवंतांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. तसेच निशुल्क आरोग्य तपासणी घेण्यात आली 


ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्व बळीरामजी दखने यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिन, जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष स्व श्री बळीरामजी दखने यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री डॉ राजेन्द्र  दखने, ग्रामहित शिक्षण संस्थेचा सचिव डाॅ. रश्मी वर्मा, लाईव्ह अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक खोब्रागडे , वेकोलीचे प्रबंधक श्री आनंद  चौकसे, गटशिक्षणाधिकारी सौ संगीता तभाने, शिक्षण विस्तार अधिकारी सौ रामटेके मॅडम, प्राचार्य श्री मिलिंद वानखेडे, पत्रकार श्री मालवीय सर, दखने हायस्कूल कन्हानच्या मुख्याध्यापिका सौ विशाखा ठमके, विकास प्राथमिक शाळा कन्हानचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र खंडाईत, धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव श्री खिमेश बढिये, मॅनेजर जियोलाॅजी प्रफूल सिंग, मुख्यप्रबंधक माईन सत्यजित दत्ता, ऑफिस सुपरिडन्ट प्रफूल राऊत, श्री संगई ,महात्मा फुले येथील मुख्याध्यापक धिरज यादव उपस्थित होते. 


कोविड - १९ च्या पाश्र्वभूमीवर शासनाला कोविड विरुद्ध लढण्यासाठी पूर्वानुभव लक्षात घेता मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. सामाजिक दायित्व जपण्यासाठी प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तर्फे या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी व्यक्त केले. यावेळी आवाहनाला प्रतिसाद देत ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच यावेळी शुगर, बीपी, हिमोग्लोबीन, ईसीजी याची तपासणी सुध्दा मोफत करण्यात आली. रक्तदान कार्यक्रमाला रेनबो ब्लड बॅक नागपूर, डॉ रवी भांगे, डॉ गिरी यांच्यासह रेनबो ब्लड बॅंकेच्या चमूने सहकार्य केले. 


प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन तर्फे गरजवंताना जयंतीनिमित्त १०१ ब्लॅकेटचे व वृक्षाचे वाटप करण्यात आले. या आरोग्य तपासणी व रक्तदान यज्ञात मोठ्या प्रमाणात नागरिक कोविड - १९ नियम पाळून सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला मनसर माईनचे उपमहाप्रबंधक मनोज सिंग, कांद्री माईन शाखा प्रबंधक आनंद चौकसे, प्राचार्य मिलिंद वानखेडे, संजय भोयर, सौ पुनसे, प्रशांत जांभूळकर, आनंद यादव, शुभम डोकरिमारे, अभिनव ढेगंरे,  अनिता खंडाईत, ज्योत्सना मेश्राम, विजय लांडे, उमेश बापट, श्याम गासमवार, महानंदा इळपाते,  कामिनी पाटील ,प्रशांत सरपाते,   मिलिंद वाघमारे, प्रभाकर खंडाते , श्री ठकराले सह विद्यार्थी उपस्थित होते. विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, पत्रकार संघ मनसर, रामटेक, कन्हान, पारशिवनी, माॅयल फुटबॉल क्लब नागपूर, बिरसा मुंडा फुटबॉल क्लब कांद्री, लाईव्ह अर्थ सेवा संरक्षण ट्रस्ट नागपूर, शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर सह्योगी संघटना यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा