रामटेक तालुका मुख्याध्यापक सहविचार सभा


रामटेक तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा आज (२१) श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडली.




या सहविचार सभेत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री रविंद्र काटोलकर यांनी online दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी श्री अशोक उईके उपस्थित होते. या बैठकीत शैक्षणिक सत्र 2020-21 च्या बाबत करावयाच्या कार्यवाही, शासनास आवश्यक माहिती, शिष्यवृत्ती माहिती, २५ टक्के कमी झालेला अभ्यासक्रम, विद्यार्थी प्रवेश, आधारकार्ड अपडेट, शाळासिद्धी, इयत्ता 11 वी प्रवेश, शालेय पोषण आहार, स्थायी समिती शाळा भेटी, विद्यार्थी लाभाच्या योजना इत्यादी विविध विषयावर गट शिक्षणाधिकारी यांनी चर्चा केली. या बैठकीत तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा