Ads block

Powered By kavyashilp Digital Media

संस्थेचे कार्य -


१) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील अन्याय ग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे

२) शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात रणशिंग फुंकणे

३) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकास हितार्थ शिष्यवृत्ती व इतर समस्यांवर आवाज बुलंद करुन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे

४) प्रत्येक मूल शिकले पाहिजे हे ध्येय ठेवून प्रत्येकापर्यंत संघटनेच्या माध्यमातून शिक्षणगंगा पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे

५) वंचित, उपेक्षित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे

६) संघटनेच्या माध्यमातून सामाजिक दायित्व जोपासणे (रक्तदान शिबीर, अन्नछत्र, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, व्यवसाय प्रशिक्षणाचे मार्गदर्शन)


5) शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना Union Bank कडून 79 लाखाची विमा योजना मिळवून दिली.

दिनांक - 6 आॅगस्ट 2020


6) वरिष्ठ व निवड श्रेणीचा काळा जीआर (आॅक्टोंबर 2017) रद्द करण्यासाठी थेट शिक्षण संचालकांना साकडे

दिनांक - 25 आॅक्टोंबर 2018


7)प्राथमिक शिक्षकांना शिक्षक मतदार संघात मतदानाचा हक्क मिळावा यासाठी 2016 पासून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा. नुकतीच राज्य निवडणूक अधिकारी श्री श्रीकांत देशपांडे यांची 1 मार्च 2021 रोजी भेट घेतली


8) आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी लढा (आश्रमशाळा जिल्हा संघटक श्री राजू खोरे यांच्या नेतृत्वाखाली) 

दिनांक - 3 जून 2019


9)कोविड सर्वेक्षण व इतर कामात सहभागी मात्र मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांना 50 लाखाचा कोरोना योध्दा विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न 

दिनांक - 16 सप्टेंबर 2020


10) सामाजिक दायित्व जोपासत उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणपोईच्या गुढ्या 


11) पुस्तक दान संस्कृतीचा प्रचार व प्रसार करुन वाचनालय सक्षम करण्यासाठी पुढाकार 

दिनांक - 20 मार्च 2020

1 टिप्पणी:

 1. प्रति,
  मा.ना.श्री.धनंजय मुंडेजी,
  मंत्री,सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग मंत्रालय मुंबई,
  महाराष्ट्र राज्य.

  मार्फत - मा. श्री. मिलींदजी वानखेडे, अध्यक्ष, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर
  विषय- स्नेहसदन मतिमंद मुला मुलीचीं विशेष अनिवासी शाळा, शितलवाडी ता. रामटेक जि.नागपुर शाळेस विशेष बाब म्हणुन अनुदान तत्वावर मंजुरी मिळणेबाबत.
  संदर्भ - जा क्र.दिकआ/प्र-4-मति/स्नेहसदन/अनुदान/नागपूर/2020-21
  COM PwD-14018/3/2021-PWD.Section 4
  दिनांक - 08/02/2021 नुसार,
  महोदय,
  उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास विनंती करण्यात येते कि, अपंग व निराधार बहुउद्देशिय कल्याणकारी संस्था नागपूर द्वारा संचालीत स्नेहसदन मतिमंद मुला मुलीचीं विशेष अनिवासी शाळा, शितलवाडी ता.रामटेक जि.नागपूर हि शाळा दिव्यांग (मतिमंद)मुलाचें विशेष शिक्षण प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविण्याचे व समाजाच्या मुख्यप्रवाहात आणन्याचे गेल्या 21 वर्षापासुन विना-अनुदान तत्वावरिल मान्यतेवर कार्य करीत आहे.
  अनुदान अभावी अनेक आर्थीक अडचणी शाळेसमोर व निरतंर सेवा देणा-या शिक्षक, कर्मचा-या समोर निर्माण झालेली आहे. दिव्यांग शाळाना अनुदान तत्वावर मान्यता प्रदान करित असतानी वेळोवेळी शासनाच्या तांत्रीक चुकिमुळे अनुदानापासून वंचित राहलेले आहे. शासन स्तरावरून अनेक वेळा शाळेची अनुदान मान्यतेकरिता दिव्यांग शाळा संहिता 1997 व 2018 नुसार चौकशी करून अहवाल शासनास सादर केलेले आहे.
  तरिपण संदर्भीय सलग्न पत्रान्वये मा. आयुक्त, दिव्यांग कल्याण, आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा सादर केलेल्या प्रस्तावान्वये तात्काळ स्नेहसदन मतिमंद मुला मुलीचीं विशेष अनिवासी शाळा, शितलवाडी ता.रामटेक जि.नागपूर शाळेस विशेष बाब म्हणुन अनुदान तत्वावर मान्यता प्रदान करून शासन निर्णय निर्गमीत करून सदर शाळेला न्याय प्रदान करावा करिता हि विनंती.
  धन्यवाद
  आपला नम्र
  श्री.पंकज व्ही.पांडे
  शाळा प्रमुख
  स्नेहसदन मतिमंद मुला मुलीचीं विशेष अनिवासी शाळा, शितलवाडी ता.रामटेक जि.नागपूर मो.नं.9175116612

  उत्तर द्याहटवा